सारवे येथे ट्रकच्या धडकेने आरोग्य सेवकाचा मृत्यू

By admin | Published: July 17, 2017 04:57 PM2017-07-17T16:57:39+5:302017-07-17T16:57:39+5:30

अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा

The death of the health worker by the torch of a truck in Sarve | सारवे येथे ट्रकच्या धडकेने आरोग्य सेवकाचा मृत्यू

सारवे येथे ट्रकच्या धडकेने आरोग्य सेवकाचा मृत्यू

Next

ऑनलाईन लोकमत

पारोळा, दि.17 - ट्रकने  धडक दिल्याने, आरोग्य सेवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सारवे गावाजवळ घडली.
 एरंडोल येथील गजमल नगरातील रहिवाशी  कैलास चुडामण पवार (47) हे मंगरूळ केंद्रांतर्गत असलेल्या सावखेडा आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. ते सोमवारी सकाळी दुचाकीने  (एमएच 19- सीएस 4494) मंगरूळ येथील  आरोग्य केंद्रात गोळ्या, औषधी घेण्यासाठी जात होते.  सारवे गावनजीकाच्या गतिरोधक जवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धड़क दिल्याने ते गंभीर जखमी झाले.  त्यांना रुग्णवाहिकेने पारोळा येथे कुटीर रुग्णालयात  नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी  शरद रमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात  प}ी, दोन मुले, मुलगी आहे. 

Web Title: The death of the health worker by the torch of a truck in Sarve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.