मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:09 AM2018-09-11T01:09:47+5:302018-09-11T01:12:45+5:30
पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय प्रौढ इसम मासेमारीसाठी बहुळा प्रकल्पावर गेला असता त्याला सर्पदंश झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला.
पाचोरा : वेरुळी खुर्द ता. पाचोरा येथील ५५ वर्षे वयाचा मच्छिमार बहुळा प्रकल्पात मासेमारी करण्यासाठी गेला असता त्यास विषारी सापाने दंश केल्याने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेरुळी येथील राघो शंकर भिल हा आठ रोजी सायंकाळी सहा वाजेचे दरम्यान बहूळा प्रकल्पात मासे पकडण्यासाठी गेला होता. या दरम्यान त्यास विषारी साप चावल्याने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले, तथापि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर सोमवारी वेरुळी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, दोन भाऊ आणि वृद्ध आई वडील असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्या विमलबाई भिल यांचे पती होत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार हिरामण चौधरी करीत आहेत.