‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:20 PM2020-07-20T22:20:49+5:302020-07-20T22:22:40+5:30
चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. जामनेर तालुक्यात घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात जाणाºया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर लक्ष्मण हिरे (२०, रा.पहूर कसबे, ता.जामनेर) याचा पर्दाफाश केला.
जळगाव : चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. जामनेर तालुक्यात घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात जाणाºया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर लक्ष्मण हिरे (२०, रा.पहूर कसबे, ता.जामनेर) याचा पर्दाफाश केला.
स्थानिग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी हवालदार विकास वाघ, नंदलाल पाटील, विजय श्यामराव पाटील, सचिन महाजन व भगवान पाटील यांचे पथक सोमवारी जामनेर तालुक्यात घरफोडीच्या तपासासाठी रवाना केले होते. पहूरकडून शेंदुर्णीकडे जात असताना सागर हिरे हा दुचाकीवर पुढे चालत होता. त्याच्याजवळील दुचाकीवर नंबरप्लेटवर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ असे लिहिले होते. क्रमांक नसल्याने पोलिसांनी संशयावरुन सागर याला थांबविले व दुचाकी कोणाच्या नावावर आहे, क्रमांक काय याची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
आरटीओ अॅपवर तपासले क्रमांक
आरटीओच्या अॅपवरुन गाडी क्रमांक तपासले असता वेगळेच नाव आले, त्यामुळे संशय अधिक बळावला. ‘खाकी’ स्टाईल चौकशी केल्यावर सागरने ही दुचाकी गेल्या वर्षी जामनेर येथील वाकी रस्त्यावरील स्टेट बॅँकेच्या समोरुन चोरल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सोयगाव, जि.औरंगाबाद येथून आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही चोरीच्या दुचाकी त्याने काढून दिल्या. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही दुचाकीसह त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.