निवडणूक कर्तव्यावर मृत्यू, प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत 

By सुनील पाटील | Published: June 15, 2024 11:25 AM2024-06-15T11:25:57+5:302024-06-15T11:26:19+5:30

जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग : रामदेववाडीतील मयत महिलेचाही समावेश

Death on election duty, grant of Rs.15 lakhs each  | निवडणूक कर्तव्यावर मृत्यू, प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत 

निवडणूक कर्तव्यावर मृत्यू, प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत 

जळगाव : लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सहा जणांना शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. रामदेववाडी अपघातात मृत झालेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या महिलेचाही यात समावेश आहे. चव्हाण या आशा स्वयंसेविका असून रामदेववाडी येथे निवडणुकीची सोपविलेली जबाबदार पूर्ण करुन घरी परत असताना अपघातात त्यांच्यासह चार जण ठार झाले होते.

रावेर तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक डिगंबर निवृत्ती गाजरे, होमगार्ड संतोष बापुराव चऱ्हाटे, लघू पाटबंधारे विभागाचे वाहन चालक मुरलीधर सोना भालेराव, महानगरपालिकेचे लिपिक संजय भगवान चौधरी, चोपडा पंचायत समितीचे कर्मचारी हिरामण ज्ञानेश्वर महाजन व वच्छलाबाई सरदार चव्हाण आदींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना ही मदत मिळणार आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. ही रक्कम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लागलीच वितरीत करण्यात आली आहे. 
 

Web Title: Death on election duty, grant of Rs.15 lakhs each 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव