जळगाव येथे पोलीस भरतीच्या ड्युटीला असलेल्या पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:39 PM2018-03-22T12:39:57+5:302018-03-22T12:39:57+5:30
पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या संजय नथ्थू सपकाळे (वय ४८ रा. सिटी पोलीस लाईन, जळगाव मुळ रा.केकतनिंभोरे, ता.जामनेर) या पोलीस कर्मचाºयाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २२: पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या संजय नथ्थू सपकाळे (वय ४८ रा. सिटी पोलीस लाईन, जळगाव मुळ रा.केकतनिंभोरे, ता.जामनेर) या पोलीस कर्मचाºयाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संजय सपकाळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाल्याने तेथे त्यांची मैदानाच्या बाहेर देखरेखीसाठी ड्युटी लावण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांना चक्कर आली.राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांनी अन्य सहकाºयांना सपकाळे यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितले. खासगी दवाखान्यात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तेथून आठ वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
२६ वर्ष जिल्ह्यात सेवा
सपकाळे हे ४ जून १९९२ रोजी पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस मुख्यालय, जळगाव एमआयडीसी, शनी पेठ, पोलीस मुख्यालय, बोदवड व पुन्हा पोलीस मुख्यालय अशी त्यांनी सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा भूषण व दोन मुली आहेत. तिन्ही मुले अविवाहित आहेत.