जळगावात मॉर्र्निंग वॉक करीत असताना पुण्याच्या डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:36 PM2018-07-03T12:36:53+5:302018-07-03T12:38:55+5:30
अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : मॉर्निंग वॉक करीत असताना डॉ.विष्णु माणिक कुटे (वय ६५, रा.कोथरुड, पुणे) यांचा सोमवारी सकाळी अचानक मृत्यू झाल्याची घटना दत्त कॉलनीत सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विष्णु कुटे हे पत्नी साधना यांच्यासह दत्त कॉलनीतील नातेवाईकांकडे आलेले होते. ते सोमवारी सकाळी कॉलनीतच फिरायला गेले असता रस्त्यावर अचानक चक्कर येऊन कोसळले. गल्लीतील लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. डॉ.कुटे यांना घरी यायला उशिर झाल्याने पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली.