जळगावात सात बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:15+5:302021-04-19T04:15:15+5:30
जळगाव : शहरातील मृत्यू दिवसेंदिवस वाढतच असून यात रविवारी ७ बाधितांचे मृत्यू झाले आहे. मृतांची संख्या ४५७ वर पोहोचली ...
जळगाव : शहरातील मृत्यू दिवसेंदिवस वाढतच असून यात रविवारी ७ बाधितांचे मृत्यू झाले आहे. मृतांची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. दरम्यान, नवीन १९० रुग्ण आढळून आले असून ९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील मृत्यू थांबत नसल्याचे गंभीर चित्र काही दिवसांपासून कायम आहे. दुसरीकडे शहरातील २९५ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात रविवारी नवीन रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले मात्र, मृत्यूचा उच्चांक नोंदविण्यात आल्याने चिंता कायम आहे. रविवारी ६९४८ ॲन्टीजेन चाचण्या तर २३९३ आरटीपीसीआरचे अहवाल समोर आले. तर २०६६ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शहरातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून सरासरी १२०० तपासण्या एका दिवसात केल्या जात आहेत. यात बाधितांचे प्रमाण आता दहा टक्क्यांवर आल्याची माहिती आहे. विविध भागात शिबिर लावून, रस्त्यावर फिरणाऱ्यांची अशा या तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे मृत्यू थांबेना
जळगावातील ५४, ६२, ७० वर्षीय पुरूष, ५०, ७०, ७०. ८१ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला आहे. एरंडोल तालुक्यात ४ तर पारोळा ३ तसेच जामनेर, भुसावळ प्रत्येकी २, अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूची संख्या १९३१ वर पोहोचली आहे.
सक्रिय रुग्ण १११९३
लक्षणे असलेले रुग्ण ३३९४
लक्षणे नसलेले ७७९९
ऑक्सिजनवरील रुग्ण १५७९
अतिदक्षता विभागातील रुग्ण ८५१
मृत्यू दर
१.७७ टक्के
रिकव्हरी रेट ८७.९९ टक्के
पाच हॉटस्पॉट
जळगाव तालुका २०२
भुसावळ १६१
चोपडा १३२
एरंडोल ६७
पाचोरा ६६