जळगावात सीईटीचा पेपर देण्यापूर्वीच विद्याथ्र्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 11:08 AM2017-05-12T11:08:03+5:302017-05-12T11:08:03+5:30
ेरेल्वे रुळावर आढळला मृतदेह : मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई बेशुध्द
Next
जळगाव,दि.12- सीईटीच्या पेपरची तयारी करून घराबाहेर पडलेल्या रोहीत अतुल भोळे (वय 25 रा.ख्वॉजामियॉ चौक, जळगाव) या तरुणाचा बुधवारी रात्री अकरा वाजता बजरंग पुलाजवळ अप लाईनवर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, रोहीत याचा अपघात आहे की आत्महत्या याबाबत स्पष्ट होऊ श्कले नाही. दरम्यान, याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बजरंग पुलाजवळ अप लाईनवर खांब क्रमांक 411/17-19 जवळ रुळावर एक तरुण जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना समजली होती. त्यानुसार उपनिरीक्षक खलील शेख व सहका:यांनी घटनास्थळ गाठले. याचवेळी रोहीतचा शोध घेत असलेले त्याचे आई व वडीलही घटनास्थळावर पोहचले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याची आई जागेवरच बेशुध्द पडली होती.
रोहीत हा रोज रात्री जेवण झाल्यानंतर फिरायला घराबाहेर निघतो. त्यानुसार तो बुधवारीही रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यावेळी आई वृषाली यांनी त्याला तुझा उद्या सीईटीचा पेपर आहे ना? अभ्यास करीत नाही का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने ‘आई माझा अभ्यास झाला आहे, पेपर अगदी सोपा जाईल, तू चिंता करू नको’ असे सांगितले होते.
रोहीत हा बराच वेळ झाला तरी घरी आला नाही, म्हणून वडील अतुल भोळे व आई वृषाली दोघंही त्याचा शोध घेत होते. तितक्यात रेल्वे रुळावर एका तरुणाचा अपघात झाला आहे, असे समजल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली असता मुलगाच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यामुळे आई-वडिलांनी एकच आक्रोश केला.