निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:29+5:302021-04-09T04:17:29+5:30
जळगाव : अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल शेखचंद छाजेड (६४, रा. द्रौपदीनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...
जळगाव : अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल शेखचंद छाजेड (६४, रा. द्रौपदीनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. ते नगरसेवक अमर जैन यांचे मेव्हणे होत.
--
अरुणा असोदेकर
जळगाव : अरुणा असोदेकर (५५, रा. महाबळ परिसर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावाई व नातू, असा परिवार आहे. योगेश असोदेकर यांच्या त्या काकू होत.
--
श्रावण चौधरी
नशिराबाद : श्रावण चौधरी (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, मुलगी व जावई, असा परिवार आहे. विवेक चौधरी यांचे ते वडील होत.
--
प्रदीप राणे
जळगाव : प्रदीप राणे (६१, रा. प्रतापनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे, असा परिवार आहे.
--
विकास बागूल
जळगाव : जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतील कर्मचारी विकास बागूल (५५, रा. निवृत्तीनगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.
--
वसंत वानखेडे
जळगाव : सार्व. बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकारी वसंत वानखेडे (८०, रा. इंद्रनील हौ.सोसा.) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे, असा परिवार आहे.
--
राजेंद्र नाईक
जळगाव : राज इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र नाईक (४८, रा. मेहरूण) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, दोन बहिणी व भाऊ, असा परिवार आहे.
--
संतोष आंधळे
जळगाव : संतोष आंधळे (६२, रा. मेहरूण) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे, असा परिवार आहे.
--
निर्मला चव्हाण
जळगाव : निर्मला चव्हाण (६०, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. विवेक चव्हाण यांच्या त्या आई होत.
--
नामदेव सोनगिरे
जळगाव : नामदेव सोनगिरे (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार रोजी दुपारी निधन झाले. दिलीप सोनगिरे यांचे ते वडील होत.
--
सुनील अग्रवाल
भुसावळ : सुनील अग्रवाल (६०, रा. चिंतामणीविहार, तापी) यांचे आजाराने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी व जावई, असा परिवार आहे. सागर अग्रवाल यांचे ते वडील होत.
--