निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:33+5:302021-04-10T04:16:33+5:30
जळगाव : अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल शेखचंद छाजेड (६४,रा. द्रौपदीनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...
जळगाव : अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल शेखचंद छाजेड (६४,रा. द्रौपदीनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नगरसेवक अमर जैन यांचे मेव्हणे होत.
--
अरुणा असोदेकर
जळगाव : अरुणा असोदेकर (५५,रा.महाबळ परिसर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातु असा परिवार आहे. योगेश असोदेकर यांच्या त्या काकु होत.
--
श्रावण चौधरी
नशिराबाद : श्रावण चौधरी (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, मुलगी, जावई असा परिवार आहे. विवेक चौधरी यांचे ते वडील होत.
--
प्रदीप राणे
जळगाव : प्रदीप राणे (६१, रा.प्रताप नगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
विकास बागुल
जळगाव : जळगाव पीपल्स को-ऑप.बँकेतील कर्मचारी विकास बागुल (५५, रा.निवृत्ती नगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
--
वसंत वानखेडे
जळगाव : सार्व. बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकारी वसंत वानखेडे (८०, रा.इंद्रनील हौ.सोसा.) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
राजेंद्र नाईक
जळगाव : राज इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र नाईक (४८, रा.मेहरुण) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
--
संतोष आंधळे
जळगाव : संतोष आंधळे (६२, रा.मेहरूण) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
--
निर्मला चव्हाण
जळगाव : निर्मला चव्हाण (६०,रा.इंद्रप्रस्थ नगर) यांचे गुरुवारी निधन झाले. विवेक चव्हाण यांच्या त्या आई होत.
--
नामदेव सोनगिरे
जळगाव : नामदेव सोनगिरे ( ७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रोजी दुपारी निधन झाले. दिलीप सोनगिरे याचे ते वडील होत.
--
सुनील अग्रवाल
भुसावळ : सुनील अग्रवाल (६०,रा.चिंतामणी विहार तापी) यांचे आजाराने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सुन, मुलगी, जवाई असा परिवार आहे. सागर अग्रवाल यांचे ते वडील होत.
--