निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:53+5:302021-05-07T04:17:53+5:30

जळगाव : संतोषीदेवी काबरा (५७, रा. शेंदूर्णी) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

जळगाव : संतोषीदेवी काबरा (५७, रा. शेंदूर्णी) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. विपुल काबरा यांच्या त्या आई होत.

----

डॉ. सुरजमल नवाल

जळगाव : डॉ. सुरजमल नवाल (म्हसावदकर) (७९, रा.पिंप्राळा) यांचे गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ८ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोनल लाठी यांचे ते वडील होत.

---

निर्मला माळी

जळगाव : निर्मला माळी (४६, रा. शनिपेठ) यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. नरेंद्र माळी यांच्या त्या पत्नी होत.

---

सिंधू कोल्हे

जळगाव : सिंधू कोल्हे (६७) यांचे मंगळवारी पहाटे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पांडुरंग कोल्हे यांच्या त्या पत्नी होत.

---

शेख मुख्तार सुपडू

कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : शेख मुख्तार शेख सुपडू (५४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. शेख रहीम यांचे ते लहान बंधू होत.

---

नर्मदाबाई कंडारे

जळगाव : नर्मदाबाई कंडारे (रा. पार्वती नगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रश्मीकांत कंडारे यांच्या त्या आई होत.

---

निंबाजी चिम

पारंबी, ता. मुक्ताईनगर : निंबाजी चिम (७८) यांचे अल्प आजाराने निधन झाले. समाधान चिम यांचे ते वडील होत.

-----

डिगंबर मेतकर

जळगाव : भगवान नगरातील रहिवासी डिगंबर मेतकर (वय ८७) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते अतुल मेतकर यांचे वडील होत.

ताराबाई महाजन

वाघोड, ता रावेर : ताराबाई महाजन (वय ७५) यांचे दि. ५ रोजी निधन झाले. त्या माजी सरपंच लक्ष्मीकांत विठ्ठल महाजन यांच्या मातोश्री होत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.