निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:45+5:302021-03-06T04:16:45+5:30
दगडू चौधरी जळगाव : दगडू चौधरी (८३, रा.ममुराबाद) शुक्रवारी नंदुरबार येथे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...
दगडू चौधरी
जळगाव : दगडू चौधरी (८३, रा.ममुराबाद) शुक्रवारी नंदुरबार येथे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. सुधीर दगडू चौधरी यांचे ते वडील होत.
नथ्थु महाजन
जळगाव : सेवानिवृत्त गटविकास अधिकारी नथ्थू महाजन (६६, रा.गजानन हाैसिंग सोसायटी, मुक्ताईनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. तंत्रवैद्यक शिक्षण मंडळ न्हावी मार्ग, फैजपूरचे संचालक विष्णू बोरोले यांचे ते जावई होत.
रामकृष्ण ठाकूर
जळगाव : रामकृष्ण ठाकूर (७८,रा.वाघ नगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रवींद्र ठाकूर यांचे ते वडील होत.
शोभाबाई कुळकर्णी
जळगाव : शोभाबाई कुळकर्णी (८५) यांचे गुरुवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी व भाचे असा परिवार आहे. नाना उपासनी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.
कुसुम सुरडकर
जळगाव : कुसुम सुरडकर (६५, रा.अष्टभुजानगर, पिंप्राळा) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नाती असा परिवार आहे. चंद्रकांत सुरडकर यांच्या त्या पत्नी होत.
सुमन पाटील
जळगाव : सुमन पाटील (७५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वा. निघेल. गोकूळ पाटील यांच्या त्या आई होत.
वसंत चौधरी
जळगाव : वसंत चौधरी (५३, रा.चौघुले प्लॉट) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. देवीदास चौधरी यांचे ते बंधू होत.
मंडाबाई काटे
जळगाव : मंडाबाई काटे (धनगर) (रा.डोंगर सांगवी,यावल) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
राजेंद्र भोळे
नशिराबाद : जळगांव पीपल्स को-ऑप.बँकेच्या महाबळ शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र भोळे (५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक जितेंद्र महाजन यांचे ते मेव्हणे होत.