छातीत लाथ मारल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:02 PM2019-05-28T12:02:39+5:302019-05-28T12:04:10+5:30

रामेश्वर कॉलनीतील घटना

The death of a three-year-old child after cheating in the chest | छातीत लाथ मारल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

छातीत लाथ मारल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Next

जळगाव : लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्या मद्यपी तरूणाने लाडाने जवळ आलेल्या तीन वर्षाच्या बालकाच्या छातीत लाथ मारल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात घडली. महेश अशोक जाधव असे मयत बालकाचे नाव आहे.
दरम्यान, या घटनेत बालकाला जिल्हा रुग्णालयात सोडून संशयिताने पलायन केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कैलास अशोक माळी (३४, रा.शेंदुर्णी, ता. जामनेर) याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कैलास माळी व आशाबाई हे आशाबाईचा मुलगा महेश व तीन मुलींसह रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात भाड्याच्या घरात लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सोमवारी दुपारी दोन वाजता कैलास घरी आला असता महेश हा त्याच्याजवळ लाडाने आला. तेव्हा त्याच्या शर्टाला पेनची शाई लागलेली दिसली. त्याबाबत कैलास याने महेशला विचारले, मात्र त्यात तो काहीही बोलला नाही. लाडाने जवळच थांबल्याने कैलास याने महेश याच्या छातीत लाथ मारली. त्यात तो लांब फेकला गेला व झटके द्यायला लागला.
रस्त्यातच सोडले प्राण
तोंडातून फेस व झटके येत असल्याने घाबरलेल्या कैलास याने आशा व शेजारच्या महिलांच्या मदतीने महेश याला दुचाकीवरुन रामेश्वर कॉलनीतील खासगी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रस्त्याने आणतानाच तो जास्तीचे झटके देत होता. काही अंतरावरच त्याने प्राण सोडले. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Web Title: The death of a three-year-old child after cheating in the chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव