जळगाव शहरात मृतांची संख्या ४०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:28+5:302021-04-05T04:14:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात रविवारी पुन्हा तीन कोरोना बाधितांचे मृत्यू झाले. यात मृतांची संख्या ४०० वर पोहोचली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात रविवारी पुन्हा तीन कोरोना बाधितांचे मृत्यू झाले. यात मृतांची संख्या ४०० वर पोहोचली आहे. दुसरीकडे २४८ नवे रुग्ण आढळून आले असून २६५ रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील रुग्णसंख्या काही दिवसांपासून स्थिर असली तरी मृत्यू मात्र थांबत नसल्याने चिंता कायम आहे.
शहरातील एकूण रुग्णांची संख्या २४,७४९ वर पोहोचली आहे. तर २५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात २३ नवे बाधित आढळून आले आहेत. ग्रामीणमधील रुग्णांची संख्या ३६७६ झाली असून मृतांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. ग्रामीणमधील २६५ रुग्णांवर उपचार सुरू झाले आहे. दरम्यान, चोपड्यात रुग्णवाढ कायम असून रविवारी चोपड्यात २५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कमी चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरचे १७१० अहवाल आलेे त्यात ४०२ बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजन तपासणीत ७७७ बाधित समोर आले आहेत.
मृतांमध्ये जळगाव शहरातील ८३ वर्षीय पुरूषासह, ६४ व ८६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. यासह जामनेर, धरणगाव, चोपडा या ठिकाणी प्रत्येकी २, पारोळा, भुसावळ, एरंडोल, रावेर, अमळनेर या तालुक्यात प्रत्येकी १ बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अतिदक्षता विभागातील रुग्ण : ५२८
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारे रुग्ण : १३०४
लक्षणे नसलेले रुग्ण : ८८८७
उपचार सुरू असलेले एकूण रुग्ण ११५७९