पाळधी येथे महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातातील जखमी पुतण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:59 PM2017-10-21T14:59:48+5:302017-10-21T15:01:26+5:30
भाऊंबदकीत नात्याने काका-पुतणे असलेल्या अरविंद अशोक माळी (वय २६) व गजानन नारायण माळी (वय ३०) दोन्ही रा.पाळधी, ता.धरणगाव या दोघांची दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला गजानन माळी याचा शनिवारी सकाळी ९ वाजता खासगी दवाखान्यात मृत्यू झाला तर त्याचा काका अरविंद यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २१ : भाऊंबदकीत नात्याने काका-पुतणे असलेल्या अरविंद अशोक माळी (वय २६) व गजानन नारायण माळी (वय ३०) दोन्ही रा.पाळधी, ता.धरणगाव या दोघांची दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला गजानन माळी याचा शनिवारी सकाळी ९ वाजता खासगी दवाखान्यात मृत्यू झाला तर त्याचा काका अरविंद यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद माळी व गजानन माळी हे दोन्ही काका-पुतणे १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता लक्ष्मी पुजनाच्या दिवशी स्वतंत्र दुचाकीने जात असताना पाळधी येथे महामार्गावर बायपास जवळ दोघांच्या दुचाकी समोरासमोर धडकल्या. त्यात दोघांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील व सहकाºयांनी या दोघांना खासगी दवाखान्यात दाखल केले होते. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गजानन याची शनिवारी सकाळी नऊ वाजता प्राणज्योत मालवली.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
गजानन याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांची खासगी व सरकारी रुग्णालयात गर्दी झाली होती. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड आक्रोश केला. प्रताप पाटील यांनी नातेवाईकांना धीर देत यंत्रणेला हाताशी धरुन तातडीने पंचनामा करण्यापासून तर शवविच्छेदन करण्यापर्यंत प्रक्रिया पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान, या अपघातातील काकाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.