भुसावळ विभागातील दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:46 PM2017-06-22T17:46:15+5:302017-06-22T17:46:15+5:30

साकरी येथील संदीप गोपाळ मोरे (वय 35) या इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला़

Death of two youths in Bhusaval division | भुसावळ विभागातील दोन तरुणांचा मृत्यू

भुसावळ विभागातील दोन तरुणांचा मृत्यू

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.22 : तालुक्यातील साकरी येथील संदीप गोपाळ मोरे (वय 35) या इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला़ गुरुवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ 
गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस वरणगाव रेल्वे स्थानकावर येत असताना ही घटना घडली़ या इसमाने रेल्वेखाली उडी घेतली की रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला याची माहिती मिळू शकली नाही़ मयत इसम साकरी येथील असल्याचे व त्याचा हातमजुरीचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आल़े  त्यांच्या   पश्चात प}ी, दोन मुली, आई भाऊ व वहिनी असा परीवार आह़े 
सारोळ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या
मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील 35 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना 21 जून रोजी रात्री घडली. रमेश विठ्ठल इंगळे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आह़े गणेश इंगळे (रा.सारोळा) यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Death of two youths in Bhusaval division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.