जळगावात विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पती व सासऱ्याने काढला पळचिंचखेडा येथील विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:47 AM2018-12-13T11:47:47+5:302018-12-13T11:48:28+5:30

विष पाजून ठार केल्याचा आरोप, रूग्णालयात तणाव

Death of wife, husband, father-in-law, dies in Jalgaon | जळगावात विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पती व सासऱ्याने काढला पळचिंचखेडा येथील विवाहितेचा मृत्यू

जळगावात विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पती व सासऱ्याने काढला पळचिंचखेडा येथील विवाहितेचा मृत्यू

Next

जळगाव : विष बाधा झाल्याने मृत झालेल्या रत्नाबाई ज्ञानेश्वर पाटील (वय २७, रा. चिंचखेडा, ता.जामनेर) हिचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात टाकून सासरच्यांनी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. रत्नाबाई हिला सासरच्यांनी विष पाजून ठार मारल्याचा आरोप भाऊ गोपाळ तुळशीराम पाटील व वडील तुळशीराम नथ्थू पाटील (रा.धानवड, ता.जळगाव) यांनी केला आहे. सासरच्यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा माहेरच्या लोकांनी घेतला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात वातावरण तापले होते.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धानवड येथील तुळशीराम नथ्थू पाटील यांची लहान मुलगी रत्नाबाई हिचा विवाह सात वर्षापूर्वी चिंचखेडा येथील ज्ञानेश्वर शंकर पाटील याच्याशी झाला होता. दोघांना मुलगा साई (वय ४) व मुलगी धनश्री (वय २) अशी अपत्ये आहेत. लग्नाच्यावेळी मानपान म्हणून पतीला २ लाख ५१ हजार रुपये रोख, पाच तोळे सोने दिले होते. तरीही लग्नानंतर काही दिवसातच मानमान, मुळ न लावणे या कारणावरुन रत्नाबाई हिचा छळ सुरु झाला. गेल्या काही महिन्यापासून तर माहेरुन पैसे आणावेत यासाठी जास्तच छळ सुरु झाला होता.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा
रत्नाबाई हिची आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप करुन पती ज्ञानेश्वर शंकर पाटील, सासरा शंकर पाटील व सासु रुख्माबाई यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हा पेठचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली.
पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हा दाखलचे आदेश
मयत रत्नाबाई हिचे वडील तुळशीराम पाटील, भाऊ गोपाळ पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह अन्य नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. शिंदे यांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना जळगावला बोलावले. या प्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश शिंदे यांनी इंगळे यांना दिला. त्यानुसार सर्व नातेवाईक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेले. तेथे फिर्यादही तयार झाली, मात्र सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. दरम्यान, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे देखील रुग्णालयात आले होते.
भाऊ...माझा जीव धोक्यात आहे, मला घ्यायला लवकर ये
रत्नाबाई हिचा भाऊ गोपाळ याने सांगितले की, रत्नाबाई हिला दोन दिवसापासून जास्त त्रास होता. मंगळवारी दुपारी तिला पतीने बेदम मारहाण केली. तेव्हा सायंकाळी तिने फोन करुन पतीच्या त्रासाची माहिती दिली. तुला रात्रीतून जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. सकाळी तुला घ्यायला येतो असे तिला सांगितले असता बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेहच दिसला. विष प्राशन झाल्यामुळे नाही तर विष पाजल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप गोपाळ पाटील याने केला.
शवविच्छेदन झालेच नाही
सायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. दुसरीकडे रत्नाबाई हिच्या मुलांच्या नावावर शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी केली होती. ही प्रक्रिया देखील सायंकाळपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा व शवविच्छेदनाचा निर्णय आता गुरुवारीच होणार आहे. त्यामुळे जामनेरचे निरीक्षक इंगळे व सहकारी सायंकाळी परत गेले.
रुग्णालयात कोणी आणले माहितच नाही...
रत्नाबाई हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती चिंचखेडा येथील काही लोकांनी दिल्यावरुन भाऊ गोपाळ, वडील ज्ञानेश्वर पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह माहेरचे लोक जिल्हा रुग्णालयात आले असता आपत्कालिन कक्षात मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनगृहात मृतदेह नेण्याची तयारी सुरु होती. मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. गावकºयांनी हा मृतदेह आणला असे काही जण सांगत होते तर काही जण सासरच्यांनी आणला असे सांगत होते. मात्र मृतदेहाजवळ कोणीच नव्हते. अखेरपर्यंतही कोणी आले नाही तर पती व सासराच मृतदेह टाकून निघून गेले, अशी माहिती रत्नाबाईचा भाऊ गोपाळ याने दिली.

Web Title: Death of wife, husband, father-in-law, dies in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव