त्वचाविकार झालेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:18 AM2021-08-15T04:18:42+5:302021-08-15T04:18:42+5:30
जळगाव : न्यूमोनियातून बरी झालेल्या एका महिलेला त्वचाविकार उद्भवल्याने या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी ...
जळगाव : न्यूमोनियातून बरी झालेल्या एका महिलेला त्वचाविकार उद्भवल्याने या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. नातेवाइकांनी ही घटना समजताच प्रचंड आक्रोश केला. राधाबाई चेतन हतागडे (२८), असे मृत महिलेचे नाव आहे.
राधाबाई यांना न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र, अचानक त्यांना त्वचाविकाराचा त्रास झाल्याने त्यांना शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खासगी रुग्णालयात आम्ही ५७ हजार रुपये भरले. मात्र, हा त्वचेचा आजार कसा झाला, असा प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित केला. राधाबाई यांच्या पश्चात आकाश, विकास, नीलेश आणि परी ही मुले आहेत. त्यांचे पती महानगरपालिकेत कार्यरत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.