भावाच्या साखरपुडय़ात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 01:04 AM2017-02-13T01:04:51+5:302017-02-13T01:04:51+5:30
हातेड : निवडणुकीचा प्रचार दोन दिवस आधीच थांबला
खेडगाव, ता.भडगाव : स्थापत्य अभियंता धनंजय नीळकंठ पाटील (वय 24) यांचा मावस भावाच्या साखरपुडय़ाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 12 रोजी दुपारी हातेड, ता.चोपडा येथे ही घटना घडली.
पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी नीळकंठ तोताराम पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाने खेडगावसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आजोबा, काका, वडिलांना जीवदान, नातूच ठरला दुभागी
‘वसाका’चे माजी संचालक तोताराम यादव हिरे यांचे संपूर्ण कुटुंबच हृदयविकाराच्या तडाख्यात सापडले आहे. यापूर्वी धनंजयची आजी सुंदरबाईचे हृदयविकाराने निधन झाले. नंतर 80 वर्र्षाो आजोबा तोताराम पाटील यांच्यासह वडील नीळकंठ हिरे व तरुण काका कांतीलाल यांनादेखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून जीवदान मिळाले. असे असताना काळ इतका क्रूर व दुर्दैवी की नातवावर आज त्याने कोणतीही दयामाया दाखवली नसल्याची दु:खद भावना उमटत आहे. अंत्ययात्रा 13 रोजी सकाळी 9 वाजता खेडगाव येथून निघणार आहे.
प्रचार थांबला
जि.प. पं.स. निवडणुकीची धामधूम सुरू असताना तालुक्यातील एक राजकीय प्रस्थ असलेले व ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते तोताराम यादव हिरे यांच्या नातवाच्या निधनाने दोन दिवस आधीच येथील प्रचार थांबला आहे. (वार्ताहर)