सलग दुसऱ्या दिवशी कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:45+5:302021-01-13T04:39:45+5:30
जळगाव : शनिवारी ४२ वर्षीय कोरोना बाधित प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी शहरातील पुन्हा एका ४० वर्षीय ...
जळगाव : शनिवारी ४२ वर्षीय कोरोना बाधित प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी शहरातील पुन्हा एका ४० वर्षीय रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गणपती रुग्णालयात हा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, यात शहरातील २७ रुग्णांचा समावेश आहे. जळगाव शहरात सातत्याने सर्वाधिक रुग्ण समोर येत आहे. जिल्ह्याच्या एकत्रित रुग्णांच्या तुलनेत जळगाव शहरात ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्याचे गंभीर चित्र आहे. रविवारी २०६ ॲन्टिजेन चाचण्या झाल्या यात २५ रुग्ण, तर आरटीपीसीआरच्या ४९६ अहवालांमध्ये १६ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णसंख्या ५६,३१८ झाली असून, यातील ५४,४९० रुग्ण बरे झालेले आहेत. मृतांची संख्या वाढून १,३८८ झाली आहे.
या भागात रुग्ण
श्रद्धा कॉलनी दोन, मुक्ताईनगर, गणपतीनगर, शनिपेठ, लक्ष्मीनगर या भागाता प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.