शहिदासांठी निधी देण्यावरुन भोळे व सोनवणे यांच्यात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:08 PM2019-03-17T12:08:14+5:302019-03-17T12:08:47+5:30

भोळे व सोनवणे यांच्यात नेमके काय बिघडले?

Debate between Bhole and Sonawane for funding Shahidasantha | शहिदासांठी निधी देण्यावरुन भोळे व सोनवणे यांच्यात वाद

शहिदासांठी निधी देण्यावरुन भोळे व सोनवणे यांच्यात वाद

Next


जळगाव : पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना मनपातील नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्यावरून आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरुन चांगलाच वाद झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती. विशेष म्हणजे या वादा संदर्भात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या वादाची एक व्हायरल झाली. त्यामुळे भोळे व सोनवणे यांच्यात नेमके काय बिघडले. या चर्चेला उधाण आले आहे.
पुलवामा येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या सभेत कैलास सोनवणे यांनी शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे तसेच नगरसेवकानीही एक महिन्याचे मानधन देण्याचे आवाहन केले होते. या मानधना प्रकरणावरुन भोळे व सोनवणे यांच्यात दुरध्वनीवरुन शाब्दीक वाद झाले असल्याचे सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आमच्यात वाद नाही तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामासंदर्भात व शहरातील विविध कामांविषयी चर्चा झाली. आमच्यातीलच कुणी तरी अफवा पसरवत असेल. असे आमदार भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
नगरसेवक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Debate between Bhole and Sonawane for funding Shahidasantha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.