स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद

By admin | Published: May 7, 2017 05:29 PM2017-05-07T17:29:43+5:302017-05-07T17:29:43+5:30

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रभागात स्वच्छतेवरून वाद

Debate between municipal corporation and public corporation by cleanliness | स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद

स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद

Next

 भुसावळ,दि.7- देशभरात अस्वच्छतेबाबत भुसावळचा दोन नंबर आल्यानंतर झालेल्या बदनामीनंतर पालिका प्रशासन व जनआधार विकास पार्टीतर्फे स्वतंत्ररित्या शहरात स्वच्छता मोहिम राबवली जात आह़े रविवारी दुपारी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या घरासमोर जनआधारचे नगरसेवक स्वच्छता करीत असताना त्यांचा व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यात तू तू मैं मैं झाल्याने शहराच्या राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े

रविवारी दुपारी वसंत टॉकीजसमोरील घाण उचलल्यानंतर जनआधारचे नगरसेवक प्रभाग पाचमधील म्युन्सीपल पार्कमध्ये पोहोचल़े या भागात स्वच्छता करीत असतानाच नगराध्यक्ष भोळे यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या प्लॉटमधील कचरा उचलण्यात आला़ यावेळी नगराध्यक्ष व जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकात बाचाबाची झाली. याप्रसंगी गटनेता उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, अॅड़तुषार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े 

Web Title: Debate between municipal corporation and public corporation by cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.