सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांच्यातील वाद चव्हाटय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:01 PM2017-07-02T12:01:50+5:302017-07-02T12:01:50+5:30

‘नीळकंठेश्वर’मधील वादात ‘सुवर्णमहोत्सवा’ची ठिणगी. चावलखेडय़ात जमावबंदी

Debate between state minister Gulabrao Patil and BJP vice president PC Patil | सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांच्यातील वाद चव्हाटय़ावर

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांच्यातील वाद चव्हाटय़ावर

Next

 ऑनलाईन लोकमत 

धरणगाव,दि.2 - चावलखेडा येथील नीळकंठेश्वर शिक्षण संस्थेत असलेला  दोन गटातील वाद शनिवारी चव्हाटय़ावर आला. दोन्ही गटांनी आयोजित केलेल्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभाच्या पाश्र्वभूमीवर   प्रशासनाला जमावबंदी आदेश लागू करावा लागला.   या प्रकारामुळे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांच्यातील वादाने गंभीर वळण घेतल्याचे बोलले जात आहे. 
   दुस:या गटातील अध्यक्ष दगा पाटील यांनी 1 जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन संस्थेत केले होते. तर पहिल्या गटाचे अध्यक्ष पी.सी. पाटील यांनीही 1 रोजीच  संस्थेत कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये आधीपासूनच वाद आहेत. त्यात आणखी भर पडू नये, म्हणून प्रशासनाने शनिवारी जमावबंदी आदेश लागू केला.  त्यामुळे नाईलाज झालेल्या दोन्ही गटांनी वाघळूद येथील दोन मंदिरांवर दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले. संस्थेच्या परिसरात  दंगा नियंत्रक पथक तैनात होते. 

Web Title: Debate between state minister Gulabrao Patil and BJP vice president PC Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.