दहिगावातील कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:12 PM2018-09-28T17:12:59+5:302018-09-28T17:14:51+5:30
कर्ज बाजारीपणामुळे तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत भानुदास महाजन (४०) यांनी स्वत:च्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली.
Next
ठळक मुद्देकर्जबाजारीपणामुळे केली आत्महत्याशेतातील विहिरीत घेतली उडीयावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
यावल, जि.जळगाव : कर्ज बाजारीपणामुळे तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत भानुदास महाजन (४०) यांनी स्वत:च्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली.
ही घटना सायंकाळी निदर्शनास आली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चंद्रकांत महाजन यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.