पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे कर्जबाजारी शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 09:20 PM2019-08-30T21:20:53+5:302019-08-30T21:29:19+5:30
पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
देवीदास पाटील हे एकूण तीन भाऊ होते. तिघे वेगळे राहात होते. सर्वांचा उदरनिर्वाह शेती असून, ते मोलमजुरी करायचे. शुक्रवारी सकाळी देवीदास पाटील याने राहत्या घरात छताला सुती दोरीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. सतत चार वर्षांपासून दुष्काळ परिषद असून, यावर्षीसुद्धा पीक पाणी व्यवस्थित नव्हते. त्यातच सोसायटीचे कर्ज, बँकेचे कर्ज होते. चार ते पाच दिवसांपासून सावकारी कर्जाला कंटाळला होता. आज त्याला त्याचा मोठा हादरा बसला. कोणालाही कळले नाही. पोळा असल्याने सर्व घरची मंडळी कामात व्यस्त होती. अचानक झालेल्या या घटनेने मोठा हादरा बसला.
यावेळी शिरसोदे येथील पोलीस पाटील सीमा बळवंत पाटील व तुळशीराम पाटील यांनी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांनी घरात एकच हंबरडा फोडला.
आज शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा सण पोळा होता. पोळ्याच्या दिवशी पोटाचा गोळा गेल्याने त्याच्या वडिलांना दु:ख आवरणे कठीण झाले होते. घरातला कर्ता पुरुष गेल्याने आज पूर्ण घरच पोरके झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, दोन भाऊ बहिणी, वडील असा परिवार आहे. त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, असे त्याचे भाऊ तुळशीराम पाटील यांनी पारोळा पोलिसांना सांगितले.