एकतास येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:26+5:302021-06-17T04:12:26+5:30

अमळनेर : तालुक्यातील एकतास येथील ग्रामपंचयातीचा पाणीपुरवठा करणारा शिपाई रवींद्र गजमल पाटील (वय ४५) याने १६ रोजी सकाळी स्वतःच्या ...

Debt-ridden farmer commits suicide at Ektas | एकतास येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

एकतास येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next

अमळनेर : तालुक्यातील एकतास येथील ग्रामपंचयातीचा पाणीपुरवठा करणारा शिपाई रवींद्र गजमल पाटील (वय ४५) याने १६ रोजी सकाळी स्वतःच्या राहत्या घरात छताच्या बारीच्या सळईला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर पीक कर्ज होते.

या घटनेबाबत गावातील राजेंद्र संभू मोरे यांना माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील बापूराव नामदेव मोरे, साहेबराव पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, विठ्ठल पाटील यांनी धावत जाऊन रवींद्र पाटील याचा देह खाली उतरवून ताबडतोब अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारवड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला. रवींद्र पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या बहिणींना आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. मात्र, ही बाब गावातील लोकांना कळण्यापूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रवींद्र पाटील याच्यावर सेंट्रल बँकेचे ८० हजार रुपये पीक कर्ज, तसेच आठ दिवसांपूर्वी एका बचत गटाकडून ७० हजार रुपये कर्ज आणि आणखी दोन बचत गटांकडूनही कर्ज घेतले असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे फक्त दोन बिघे शेती असून, त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, असा परिवार आहे. डॉ. योगेश वाणी यांनी शवविच्छेदन केले. पोलीस पाटील बापूराव मोरे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.

Web Title: Debt-ridden farmer commits suicide at Ektas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.