आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी आंदोलनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:58+5:302021-05-30T04:13:58+5:30

आयुध निर्माणी कामगार युनियन एवम् संयुक्त कृती समितीने पत्राद्वारे महाप्रबंधक यांना निर्माणी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यासाठी निवेदन दिले होते. ...

Decision of agitation for vaccination of arms manufacturing workers | आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी आंदोलनाचा निर्णय

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी आंदोलनाचा निर्णय

Next

आयुध निर्माणी कामगार युनियन एवम् संयुक्त कृती समितीने पत्राद्वारे महाप्रबंधक यांना निर्माणी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यासाठी निवेदन दिले होते. वारंवार निवेदन देऊनही आतापर्यंत बाकी राहिलेल्या ४५ वर्षांवरील दुसरा डोस व १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी प्रशासनाने निर्णय घेतला नाही.

स्थानिक वरणगाव निर्माणीमध्ये लसीकरण सुरू आहे; परंतु आयुध निर्माणी भुसावल प्रशासन लसीकरणास प्राधान्य देत नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.

निर्माणीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सॅनिटायझेशन होत नाही. सकाळी व संध्याकाळी पंचिंग करतेवेळी गर्दी होत आहे. इतर निर्माणीत कोविडमुळे पंचिंग बंद आहे. कामगार युनियनने जिल्हा प्रशासन एवम् कोलकाता बोर्ड व संरक्षण मंत्रालयाला निवेदन दिले आहे. लसीकरण व्यवस्था करण्याची मागणी अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ-ए.आय.डी.ई.एफ.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र झा यांनी केली आहे.

Web Title: Decision of agitation for vaccination of arms manufacturing workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.