संतोष चौधरींच्या जामिनावर २४ रोजी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:34+5:302021-06-23T04:12:34+5:30

भुसावळ : पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार अतिक्रमित झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता माजी आमदार संतोष चौधरी ...

Decision on bail of Santosh Chaudhary on 24th | संतोष चौधरींच्या जामिनावर २४ रोजी निर्णय

संतोष चौधरींच्या जामिनावर २४ रोजी निर्णय

Next

भुसावळ : पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार अतिक्रमित झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, १४ जून रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौधरींविरोधात गुन्हा दाखल आहे. चौधरींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने २२ पर्यंत अंतरिम दिलासा दिल्यानंतर मंगळवारी पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी न्या. संजय भन्साली यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर २४ रोजी याप्रकरणी निर्णय देणार असल्याचे सांगितल्यानंतर आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे १४ रोजी अधिकाऱ्यांसह गेले असता माजी आमदार चौधरी यांनी तेथे आल्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता लक्ष निर्णयाकडे

चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर २२ पर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवार, २२ रोजी न्या.संजय भन्साली यांच्या न्यायासनापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या ‘से’ मध्ये चौधरी यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती देण्यात आली. न्यायालयाने आरोपींच्या वकिलाला दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याने न्यायालयाने ती मान्य केल्यानंतर २४ जून रोजी जामीन अर्जावर देण्याचे निर्णय जाहीर केले. याप्रसंगी तपासाधिकारी सहा. निरीक्षक मंगेश गोंटला न्यायालयात उपस्थित होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विजय खडसे, तर चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Decision on bail of Santosh Chaudhary on 24th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.