मुक्ताईनगरात लॉकडाऊन अतिशय सक्तीने करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:46 PM2020-05-11T16:46:02+5:302020-05-11T16:47:16+5:30
आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची बैठक घेत निर्बंध अतिशय क डक करून लॉकडाऊनलोड सक्तीने पालन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्याच्या सभोवताली असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मुक्ताईनगरमध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची बैठक घेत निर्बंध अतिशय क डक करून लॉकडाऊनलोड सक्तीने पालन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
याप्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विक्रांत जगदाळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी संजय बैरागी तसेच तालुक्यातील अंन्य अधिकारी यांच्यासह अॅड. मनोहर खैरनार, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, दीपक पवार, संतोष कोळी आदी उपस्थित होते.
तालुक्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यापुढे सोमवार ते बुधवार हे तीन दिवस व्यापारी वर्ग आणि मजूर सर्वसामान्य ग्रामीण लोकांना महत्वाचे म्हणून गुरुवार नंतरचे दिवस बंद ठेवण्यास हरकत नाही, अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
केळी वाहतुकीस आवश्यक तितकीच मुभा देवून दक्षतेच्या संदर्भात मध्यप्रदेशातील वारोळी, नाचणखेड़ा गावांकडील सीमा सक्तीने बंद ठेवण्याच्या सूचना पुन्हा दिल्या. दुकानदार आणि दुध विक्रेत्यांनी ग्राहक मास्क लावले नसेल तर माल वस्तू ग्राहकाला देउ नये. तसे असल्यास दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. हे सर्व करताना ग्रामीण ग्राहक नागरीकांसाठी संध्याकाळची कामावरुन परत येण्याची वेळ सोइची म्हणून वाढवून देण्यासाठी मुभा देण्याचे ठरले. गुरुवार ते शनिवार दरम्यान भाजी पाला मार्केट हे सक्तीने बन्द ठेवल्यास कोरोनाची साकळी मोडण्यास सोयीची ठरेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.राणे यांनी सांगितले.
ग्राहकांनी शारीरिक अंतर न पाळल्यास व ग्राहक आखलेल्या बॉक्सच्या बाहेर दिसल्यास दुकानदारवर कारवाई करण्यात यावी. दुकानांच्या गर्दीचे नियमन करण्यासाठी नगर पंचायतीने कसोशीने प्रयत्न करा. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी दर सोमवारी गावात सामाईक सभा घेतलीच पाहिजे, असे ठरविण्यात आले. आराखडा व टारगेट मोडणारांवर कडक कारवाईबाबत आधी नोटीसा देण्यात याव्या. घोळक्याने दिसणारांवर कारवाई करण्यात यावी. मास्कची सक्ती पुरुषाबरोबर महिलांवरही करा, अशा सूचना व चर्चा करण्यात आली. दुकानांच्या लेखी जागा नोंदी ठेवा. जेणेकरून दुकानांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.