किल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 11:01 PM2019-09-08T23:01:37+5:302019-09-08T23:01:44+5:30
भुसावळ : शासनाने राज्यातील शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ...
भुसावळ : शासनाने राज्यातील शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकालीन किल्ले महाराष्ट्र शासनाने भाडेतत्त्वावर देण्याचा कुटील डाव रचला असून याचा समाजमनाकडून विरोध आहे. किल्ले हे आपणास लाभलेला मोठा वारसा आहे त्याचे जतन संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे. जेणेकरून यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल.
शासनाने शिवकालीन सर्व किल्ले इतिहासाची विकृतीकरण न करता, जागतिक वस्तू रचनाकारांचे व पुरातत्त्व विभागाचे सहकार्य घेऊन किल्ले मूळ स्वरूपात पुनर्निर्माण करावे.
या आशयाचे निवेदन मराठा समाज मंडळातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनावर मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक अॅड.तुषार पाटील, कृष्णा शिंदे, संजय कदम, योगेश जाधव, सचिन पाटील, रुपेश पाटील, प्रमोद पाटील, ढगे, राहुल पाटील, विजय कलापुरे, ज्ञानेश्वर पाटील, पांडुरंग कादेले, निखिल जावरे यांच्यासह आदी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.