टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णयाअभावी व्यापाऱ्यांचा निर्णय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:11+5:302021-04-12T04:15:11+5:30
जळगाव : ब्रेक द चेनमध्ये असलेल्या अटींमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप असला तरी आता संपूर्ण लॉकडाऊन विषयी हालचाली सुरू आहे. मात्र ...
जळगाव : ब्रेक द चेनमध्ये असलेल्या अटींमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप असला तरी आता संपूर्ण लॉकडाऊन विषयी हालचाली सुरू आहे. मात्र याबाबत रविवारी संध्याकाळी टास्क फोर्ससोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने सोमवारपासून दुकाने सुरू करावी की नाही याविषयीचा निर्णय देखील लांबणीवर पडला आहे. मात्र जनतेच्या आरोग्याचा विचार करता संपूर्ण लॉकडाऊन झाल्यास त्याला पाठिंबा राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे व टास्क फोर्स यांच्यात झालेल्या बैठकीत लॉकडाऊन विषयी निर्णय होऊ शकला नाही. याविषयी आता सोमवारी दुपारी निर्णय होणार असल्याने व्यापाऱ्यांनी देखील सोमवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कॅट संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसुफ मकरा यांनी सांगितले.