नारायण राणेंबाबत निर्णय पक्षप्रमुख घेतील - चाळीसगाव भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:19 PM2017-11-02T13:19:24+5:302017-11-02T13:19:37+5:30
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला सवोतोपरी बळकटी देऊ
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 2 - नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश झालाच सत्तेत थांबायचे की बाहेर पडायचे. याबाबत योग्य तो निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, आणि तो शिवसेनेच्या हिताचाच असेल. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर सवोर्तोपरी बळकटी देण्याची भुमिका निश्चित केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
बुधवारी पाचोरा येथे कार्यक्रमाला जाण्यापुर्वी चाळीसगाव येथे माजी तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी रात्री कार्यकत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला.
चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेची बांधणी स्व. पप्पू गुंजाळ यांनी जाणीवपुर्वक केली होती. त्यांनी तळागाळात शिवसेनेचा विचार पोहचवला. त्यामुळे येत्या काळात येथील पालकत्व स्विकारुन जिल्हा उपप्रमुख व पप्पू गुंजाळ यांचे बंधू उमेष गुंजाळ यांना शक्ति दिली जाईल. शिवसेना एक सक्षम पर्याय म्हणून काम करेल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत उमेष गुंजाळही उपस्थित होते. गुंजाळ यांच्या संर्पक कार्यालयासही त्यांनी धावती भेट दिली. स्व. पप्पू गुंजाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन काही आठवणींना उजाळा दिला. नगरसेविका विजया पवार, बाजार समितीचे माजी सभापती रमेश चव्हाण, राहुल पाटील, नंदकिशोर बावविस्कर, सचिन फुलवारी, संतोष राजपुत, ज्ञानेश्वर ठाकरे, दिलीप घोरपडे, गुणवंत शेलार, सागर चौधरी आदी उपस्थित होते.
मालेगाव - चाळीसगाव रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गी
एकनाथ शिंदे यांनी मालेगाव मार्गे चाळीसगाव मध्ये प्रवेश केला. या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या माजी तालुका प्रमुख महेंद्र पाटील व शहर प्रमुख श्यामलाल कुमावत यांच्याकडून माहिती जाणून घेतली. टोलनाका बंद झाल्यापासून गेल्या चार वर्षात रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. अशी कैफीयत त्यांच्याकडे मांडण्यात आली. यावर त्यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याविषयी तातडीने पाठपुरावा करुन रस्ता दुरुस्तीचा प्रश्न त्वरीत मार्गी लावू, असे अश्वासित केले. यावेळी शैलेंद्र सातपुते, निलेश गायके, अनुराधा पाटील, रामेश्वर चौधरी, वसिम शेख, रघुनाथ कोळी, आरीफ मुल्ला, चंद्रकांत नागणे आदींनी त्यांचा सत्कार केला.