सिव्हिल सोसायटीतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:16+5:302021-07-04T04:12:16+5:30

‘माझे गाव माझी जबाबदारी’अंतर्गत गावातील डॉ. राहुल भोईटे व डॉ. अनुजा भोईटे या दाम्पत्याच्या पुढाकाराने तीन वर्षांपापूर्वी वरणगाव सिव्हिल ...

Dedication of ambulance by civil society | सिव्हिल सोसायटीतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सिव्हिल सोसायटीतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next

‘माझे गाव माझी जबाबदारी’अंतर्गत गावातील डॉ. राहुल भोईटे व डॉ. अनुजा भोईटे या दाम्पत्याच्या पुढाकाराने तीन वर्षांपापूर्वी वरणगाव सिव्हिल सोसायटी या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून वरणगावकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका समर्पित करण्यात आली. रुग्णवाहिकेचे लोकार्पण आदर्श शिक्षक ज्ञानदेव भोईटे व जिजाबाई भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी डॉ. राहुल भोईटे, डॉ. अनुजा भोईटे, डॉ. एस.टी.पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन सोनवणे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील, डॉ. सुनील अहिरराव, डॉ. अनंत फेंगडे, डॉ. रवींद्र माळी, डॉ. योगेश कोल्हे, डॉ. नितीन बढे, डॉ. नीलेश क्षीरसागर, डॉ. रूपेश पाटील, डॉ. भागीरथ प्रजापती, डॉ. वसीम शेख तसेच सोसायटीचे कार्यकर्ते कमलेश येवले, श्रद्धा चौधरी, मोनिका सोनवणे, लखन कुंभार, अजय चाळसे, श्रीकांत माळी, गोपाळ गावंडे, दीपक सोनार, गुलाबराव धोटे, नीलेश झोपे, विनोद पाटील, रामचंद्र पाटील इ. उपस्थित होते.

Web Title: Dedication of ambulance by civil society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.