चाळीसगावकरांच्या स्वच्छतेसाठी पाच जेसीबींचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:33+5:302021-06-01T04:12:33+5:30
चाळीसगाव : केंद्र सरकारच्या कार्यकाळाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सेवा सप्ताह राबविण्यात येत असून शहरातील स्वच्छतेसाठी ...
चाळीसगाव : केंद्र सरकारच्या कार्यकाळाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सेवा सप्ताह राबविण्यात येत असून शहरातील स्वच्छतेसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत पाच जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारी सकाळपासून दोस्त चित्रमंदिर परिसर, हुडको कॉलनी परिसरात नालेसफाईसह मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली.
मध्यंतरी काही स्वच्छता सेवकांनी शहरातील नालेसफाईसह नदीपात्र स्वच्छता, मोकळ्या भूखंडाचा विकास या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची तातडीने दखल घेत आमदार चव्हाण यांनी काही महिन्यांसाठी पाच जेसीबी स्वच्छतेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. कुणालाही जेसीबी स्वच्छतेसाठी पाहिजे असल्यास संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रविवारी येथील बलराम व्यायामशाळेच्या पटांगणावर जेसीबींची पूजा करण्यात आली. या वेळी आमदारासह नगराध्यक्षा आशालता चव्हाण, वसंतराव चंद्रात्रे, के.बी. साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, प्रा. सुनील निकम, विजय शर्मा, चंद्रकांत तायडे, आनंद खरात, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, खुशाल पाटील, भास्कर पाटील, चिराग शेख आदी उपस्थित होते.
===Photopath===
310521\31jal_4_31052021_12.jpg
===Caption===
चाळीसगावकरांच्या स्वच्छतेसाठी पाच जेसीबींचे लोकार्पण