चाळीसगावला मोफत व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 06:14 PM2021-05-17T18:14:02+5:302021-05-17T18:15:01+5:30
आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे रुग्णांसाठी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोरोना उपचार केंद्रात सोमवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्या १७ मे रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रविवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे रुग्णांसाठी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोरोना उपचार केंद्रात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, के. बी. साळुंखे, प्रशांत पालवे, उद्धवराव माळी, प्रा. सुनील निकम, संगीता गवळी, संजय भास्कर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, चिराग शेख, भास्कर पाटील, अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, दिनेश बोरसे, भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, सुभाष पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर, धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, जगन्नाथ महाजन, भय्यासाहेब पाटील, राकेश बोरसे, विजय कदम, सदानंद चौधरी, नीलेश राजपूत, किशोर रणधीर, सौरभ पाटील, कैलास पाटील, जगदीश सूर्यवंशी, तुषार बोत्रे, प्रवीण मराठे, भाविक पटेल, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण, आदी उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, सेवाभाव घेऊन कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीच कमी पडत नाही. कारण तो जमिनीवर राहून काम करतो, त्यामुळे सत्ता असो वा नसो काही फरक पडत नाही, असे ते म्हणाले. मागील वर्षी माझ्या स्थानिक विकास निधीतून प्रस्तावित केलेल्या या अत्याधुनिक व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जीव वाचविणे हाच प्रयत्न राहणार असून, बाहेर अशा रुग्णवाहिकेसाठी येणारा १० ते २५ हजारांपर्यंतचा एका रुग्णाचा खर्च वाचणार आहे.
या सेवेच्या माध्यमातून मिळणारे गोरगरीब जनतेचे आशीर्वाद याच आरोग्यदूत गिरीष महाजन यांना चाळीसगाववासीयांच्या वतीने शुभेच्छा आहेत. राज्याच्या सेवेसाठी लाखो रुग्णांचे आशीर्वाद गिरीष भाऊंच्या सोबत असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.