आॅक्सिजन पाईपलाईनचे न्हावी येथे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:19 IST2020-07-30T15:19:10+5:302020-07-30T15:19:36+5:30
लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन पाईपलाईन लोकार्पण, उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.

आॅक्सिजन पाईपलाईनचे न्हावी येथे लोकार्पण
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन पाईपलाईन लोकार्पण, उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी आ.शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार उषाराणी देवगुणे, यावल सभापती पल्लवी चौधरी, चेअरमन सातपुडा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, पं.स.सदस्य सर्फराज तडवी, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, ग्रामविकास अधिकारी के.आर.देसले, सर्कल जे.डी.बंगाळे, पोलीस पाटील संजय चौधरी, तलाठी लीना राणे, दीपाली बारी, नितीन चौधरी, मिलिंद महाजन, उमेश बेंडाळे, रवींद्र तायडे, नगराध्यक्षा महानंदा होले, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इंजिनिअरिंग कॉलेज अध्यक्ष शरद महाजन यांनी सुरवातीपासून कोविड सेंटरसाठी दोन्ही वसतिगृह विनामूल्य उलब्ध करुन दिले तसेच सुरवातीपासून ग्राम पंचायतीचा मोलाचा वाटा उचलेला आहे या सर्वांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.