चाळीसगावला लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:09+5:302021-06-06T04:13:09+5:30
ट्रामा केअर सेंटरमध्ये सुरक्षित अंतर पाळून झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, ...
ट्रामा केअर सेंटरमध्ये सुरक्षित अंतर पाळून झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पत्रकार किसनराव जोर्वेकर, घृष्णेश्वर पाटील, दीपक पाटील, रोशन जाधव, चाळीसगाव एज्यु. सोसायटीच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी खासदार पाटील यांनी रमेशचंद्र अग्रवाल यांच्या सर्वस्पर्शी कार्याला उजाळा दिला. किसनराव जोर्वेकर, लक्ष्मीकांत साताळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सद्य:स्थितीत अग्रवाल परिवारातर्फे गरजू कोरोना रुग्णांना इंजेक्शन व औषधीही पुरविल्या जात आहेत. कोरोना उपचार केंद्रासाठी २० बेड यापूर्वीच देण्यात आले आहेत. प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, उपप्राचार्य बी. आर. येवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, दिलीप घोरपडे, देवीदास पाटील, सुनील राजपूत, सोनल साळुंखे, नीलेश छोरिया, सुजित पाटील, योगेश पाटील, विश्वास चव्हाण, समकित छाजेड, शेषराव चव्हाण, सचिन पवार, माजी प्राचार्य डी. टी. साळुंखे, चौधरी, अमित सुराणा, लक्ष्मण शिरुडे, राहुल राजपूत, योगेश करंकाळ, बबलू जाधव, किरण मोरे उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. आभार उद्योजक योगेश अग्रवाल यांनी मानले.
===Photopath===
050621\05jal_11_05062021_12.jpg
===Caption===
कोरोना रुग्णांसाठी लघु अॉक्सीजन पुरवठा संचाचे लोकार्पण करताना खा. उन्मेष पाटील, आशालता चव्हाण, लक्ष्मीकांत साताळकर, योगेश अग्रवाल आदि.