लोणीचा दीपकचा मृतदेह आढळला मादणीच्या तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 07:46 PM2019-07-18T19:46:15+5:302019-07-18T19:46:20+5:30
संशयास्पद मृृत्यू: पोलीस अधिक्षक श्वानपथकासह घटनास्थळी दाखल
फत्तेपूर.ता. जामनेर- येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ११ वर्षीय विद्यार्थी व आई- वडिलांना एकुलता एक पुत्र दीपक ईश्वर सुपलकर (गोंधळी) रा. लोणी, ता. जामनेर हा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा १८ रोजी मादणीच्या तलावात मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपक हा १६ रोजी घरी पोहचलेला नव्हता. याबाबतच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या दृष्टिने तपास सुरु असताना १८ जुलै रोजी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे (चाळीसगाव परिमंडल), उपविभागीय पो.अधिकारी ईश्वर कातकडे (पाचोरा भाग), स्थानिक गुन्हा शाखा जळगावचे पो.निरिक्षक बापू रोहम, पहूरचे स. पो.निरीक्षक डी.के. शिरसाठ हे शाळेत चौकशीसाठी आलेले होते.दरम्यान दुपारी २.३० वा.मादणी येथील ल.पा. तलावातील एका डबक्यात एक प्रेत तरंगताना गुराख्यांनी पाहिले. ही वार्ता शाळेत पोलिस अधिकाऱ्यांना कळताच हा ताफा तलावाकडे गेला. तेथे असले प्रेत हे दीपकचेच असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेसंर्भात डॉ.पंजाबराव उगले हे देखलील श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. आईवडिल यांची विचारपूस केली. अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना करून प्रेत उत्तरिय तपासणीसाठी शासकिय न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा जळगाव येथे रवाना केले.
या प्रकरणाबाबत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होती. उत्तरीय तपासणीचा काय अहवाल येतो याकडे परीसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.