मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

By विलास.बारी | Published: July 18, 2023 10:56 PM2023-07-18T22:56:45+5:302023-07-18T22:57:01+5:30

अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

defamation of minister girish mahajan offense against unknown person | मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

googlenewsNext

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत फेसबुकवरील आम्ही वारकरी नावाच्या पेजवर बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद देशमुख (४२, रा.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, दि.१८ रोजी संध्याकाळी ७ वाजता देशमुख हे फेबसुक पाहत असताना आम्ही वारकरी नावाच्या पेजवर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत महिलेचा संदर्भ देत बदनामीकारक वक्तव्य केले.त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: defamation of minister girish mahajan offense against unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.