महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणा:यांवर गुन्हा
By admin | Published: March 13, 2017 01:05 AM2017-03-13T01:05:16+5:302017-03-13T01:05:16+5:30
अमळनेर : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
अमळनेर : विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणा:या आणि सोशल मीडियावर त्या महिलेचे फोटो टाकून बदनामी करून धमकी देणारा तरुण आणि 25 ते 30 जणांवर अमळनेर पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आठवडे बाजारात राहणा:या एका 35 वर्षीय विधवा महिलेस लक्ष्मण उर्फ पप्पू महाजन (वय 40, रा. शारदा कॉलनी) याने लग्नाचे आमिष आणि मुलांचे पालन पोषणाचे आमिष दाखवून 16 ऑगस्ट 2012 ते 10 मार्च 2017 दरम्यान नाशिक तसेच अमळनेर येथे वेळोवेळी बलात्कार केला. तसेच धाक दाखवला. तर राहुल महाजन (35) याने व एका ग्रुपवरील 25 ते 30 सदस्यांनी त्या महिलेचे ईल फोटो प्रसिद्ध करून शिवीगाळ व दमदाटी केली, अशा आशयाची तक्रार महिलेने न्यायालयात दाखल केली होती.
न्यायालयाने कलम 156 (3) प्रमाणे तीन दिवसात चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून लक्ष्मण महाजन, राहुल महाजन यांच्यासह सोशल मीडिया ग्रुपच्या 25 ते 30 सदस्यांवर भादंवि कलम 376, 354, 417, 504, 506, 500, 34 प्रमाणे बलात्कार, मारहाणीची धमकी, बदनामी तसेच सायबर क्राईम 66 (ई) व 67 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे करीत आहेत.
(वार्ताहर)