47 कर्णबधीर शिक्षकांना अपात्र करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:51 AM2018-07-01T11:51:01+5:302018-07-01T11:54:47+5:30
विरोधकांची मागणी
Next
ठळक मुद्दे जि.प. स्थायी समितीची सभाशेवया प्रकरणावर चर्चा अर्धवट
ज गाव : जिल्ह्यात बदल्या टाळण्यासाठी अनेक शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले असून यातील 47 शिक्षकांनी कर्णबधीर असल्याचा दाखला दिला आहे. मात्र कर्णबधीर शिक्षकांना विद्याथ्र्याशी संवाद साधणे शक्य नसल्याने हे शिक्षक पात्र ठरतात का? असा सवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे यावेळी ठरले. दरम्यान हे शिक्षक अपात्र ठरवा, अशी मागणीही विरोधी सदस्यांनी केली.ही सभा शनिवारी दुपारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे व दिलीप पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील आदींच्या उपस्थितीत झाली.सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी 93 शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यात 47 शिक्षकांनी कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र याची सेवापुस्तिकेतही नोंद नाही. कर्णबधीर शिक्षक विद्याथ्र्यांशी सुसंवाद साधू शकत नाही, अशा शिक्षकांना निलंबीत करण्याची मागणी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली आहे.ग्राम पंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडून थकबाकीदार नागरिकांची यादी न्यायालयात सादर करुन नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे ग्रामनिधीची 19 कोटींची थकबाकी असताना गेल्या 20 वर्षात ग्रा.पं.वर कारवाईची हिंमत एकाही बीडीओ ने दाखविली नाही. कर वसुलीसाठी अगोदर कॅम्प घेण्यात यावे यानंतरच न्यायालयात धाव घेता आली असती मात्र सर्वसाधारण नागरिकांना नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याने हा मुद्दाही नानाभाऊ महाजन मांडला. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी अहवाल मागविला असल्याचे सांगितले.विहीरीसाठी लाच मागणा:या बीडीओंची होणार चौकशी रोजगार हमी योजनेत मान्यता मिळालेल्या विहीरीचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी करणा:या बीडीओ ए. बी. जोशी यांची आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतचौकशी होणार आहे. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या बीडीओंवर कारवाई करावी अशी मागणी मागणी करण्यात आली. ‘ईव्हीएम’ नसल्याने दराडे यांचा विजयनाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे हेविजय झाल्याबद्दलचा अभिनंदनाचा ठराव शिवसेना सदस्यांनी मांडला. तो ठरावही सभेत मंजूर झाला. यावेळी नानाभाऊ महाजन यांनी ईव्हीएम मशिनचा वापर न झाल्यानेच दराडेंचा विजय होवू शकला, अशी कोरखळी मारली.शेवया प्रकरणावर चर्चा अर्धवटबुरशीयुक्त शेवया प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. मात्र आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्याबद्दल रावसाहेब पाटील यांनी सभेत विचारणा केली मात्र मुख्य कार्यकारी अधिकारीच हजर नसल्याने या विषयी जास्त चर्चा होवू शकली नाही. अन्न औषध प्रशासनाचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, एवढेच मस्कर यांनी सांगितले.