बचाव पक्षाचा जाेरदार युक्तीवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:00+5:302020-12-07T04:11:00+5:30

१) न्यायालयात युक्तीवाद करताना ॲड.उमेश रघुवंशी यांनी विवेक ठाकरे यांनी ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी २०१३ पासून लढा उभारला आहे. ...

Defendant's strong argument | बचाव पक्षाचा जाेरदार युक्तीवाद

बचाव पक्षाचा जाेरदार युक्तीवाद

Next

१) न्यायालयात युक्तीवाद करताना ॲड.उमेश रघुवंशी यांनी विवेक ठाकरे यांनी ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी २०१३ पासून लढा उभारला आहे. पावत्या २० टक्के मॅचिंग करायला लावल्याचा प्रकार खोटा आहे. पंतप्रधान, सहकार मंत्री यांच्यापर्यंत अवसायकाच्या तक्रारी केल्या. ठेवीदारांना शंभर टक्क रक्कम मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता, त्याचाच भाग म्हणून पुण्यातील १५ ठेवीदारांनी आमची फसवणूक झालेली नाही असे न्यायालयात शपथपत्र करुन दिले. ठाकरे यांच्या घरात १२७ प्रकरणांचे कागदपत्रे, पावत्या आढळल्या, त्यातीलच हे १५ ठेवीदार आहेत. ते स्वत:हून शपथपत्र द्यायला आलेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी १९ नोव्हेंबर २०११ रोजीच त्यांच्या मुळ पावत्या ठाकरे यांच्याकडून नेलेल्या आहेत. तरी देखील त्यांनी तक्रार दिली.

२) सुजित वाणी हा सहायक प्रशासकीय अधिकारी म्हणून संस्थेत नोकरीला होता, त्यामुळे वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळणे हे त्याचे कामच होते, याचा अर्थ त्यांनी काही गैरव्यवहार केला असे नाही.

३) कमलाकर कोळी देखील चालक असल्याने त्याचा इतर व्यवहाराशी संबंध येत नाही. पोलीस त्याला अहमदनगरला घेऊन गेले होते.

Web Title: Defendant's strong argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.