देहिनोऽस्मिन्यथा देहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 09:29 PM2019-12-21T21:29:53+5:302019-12-21T21:30:46+5:30

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना ...

Dehinosminatha body | देहिनोऽस्मिन्यथा देहे

देहिनोऽस्मिन्यथा देहे

Next

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर, विष्णूतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत. भगवंत स्वत:च्या वैयक्तिक विस्ताराव्दारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णूमूर्ती आणि वैकुंठलोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रुपात प्रकट होतात.
भगवंतांचे स्वांश अर्थात, त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्याचे विभिन्नांश असणाºया जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरुपाने असतात. स्वातंत्र्य हा एक गुण आहे.
या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बध्द होतो आणि योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. योंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे. मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बध्द जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न असतो; बध्द जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि त्याला दिव्य प्रेममयी भगवत् सेवेचे विस्मरण झालेले असते.
मांजर-कुत्री, मनुष्य-प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत. बध्द जीव हा जणू काही लोखंडांच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्याच प्रमुख कारण आहे.
जेव्हा त्याचे मन सत्वगुणांमध्ये स्थित असते, तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणांमध्ये असते तेव्हा तो शुध्द जीवयोनीत भ्रमण करत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की, बध्द जीवावर, मन व इंद्रियासहित भौतिक शरिराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याचवेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ रुपात व्यक्त होतो. जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठलोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे अध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या अध्यात्मिक शरीराव्दारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. ‘स्मृती’वरूनही असे कळून येते की, वैकुंठ लोकांमध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो. भगवंतांचे विभिन्नांश असणाºया जीवांमध्ये आणि विष्णूमूर्तींच्य विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो. दुसºया शब्दात सांगावयाचे तर भगवतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.
- रेवतीरमण दास

Web Title: Dehinosminatha body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.