शासकीय केंद्रावर मका खरेदीस विलंब, शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:23 PM2020-05-25T16:23:28+5:302020-05-25T16:26:42+5:30
मका खरेदीबाबत शासनाचे आदेश येऊन बराच कालावधी उलटूनदेखील खरेदीला सुरुवात होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.
जामनेर, जि.जळगाव : मका खरेदीबाबत शासनाचे आदेश येऊन बराच कालावधी उलटूनदेखील खरेदीला सुरुवात होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. व्यापाऱ्यांकडून सध्या ८०० ते ९०० रुपये दराने खरेदी होत असून, गरजू शेतकरी नाडला जात आहे.
शेतकºयांंकडील मका संपल्यानंतर व्यापाºयांच्या भल्यासाठी खरेदीला विलंब केला जात असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. शेतकरी हिताचा आव आणून राजकारण करणारे सत्ताधारी व विरोधी पक्ष कार्यकर्ते गप्प का, असा सवाल विचारला जात आहे.
शेतकरी संघाने गोदामांची अडचण लक्षात घेऊन जामनेर बाजार समिती व फ्रुट सेल सोसायटीचे गुदाम मिळवून घेतले. तातडीने बारदान मिळावे यासाठी पणन महासंघाकडे पाठपुरावा केला. डीएमओकडून बारदान मिळत नसल्याने खरेदीला विलंब होत असल्याचे संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले.
दरम्यान, शेंदुर्णी खरेदी विक्री संघास मका खरेदीची परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. केंद्र सुरू झाल्यास पहूर शेंदुर्णी परिसरातील शेतकºयांना याचा लाभ होईल.
मका खरेदीसाठी शहरात दोन गोदामे उपलब्ध करून दिलेली आहे.
-अरुण शेवाळे, तहसीलदार, जामनेर
मका खरेदीची शेतकरी संघाकडून पूर्ण तयारी झाली असून, आजपावेतो सुमारे दोन हजार दोनशे शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी केली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे बारदान उपलब्ध झालेले नाही. शासन केवळ घोषणा करीत असून शेतकरी हतबल झाला आहे.
- चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर