‘पाडळसरे’संदर्भात शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:49 PM2019-03-01T22:49:45+5:302019-03-01T22:51:39+5:30

अमळनेर : निम्न तापी पाडळसरे धरणास निधी मिळावा या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. ...

The delegation took a dignified meeting with the Chief Minister | ‘पाडळसरे’संदर्भात शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

‘पाडळसरे’संदर्भात शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next

अमळनेर : निम्न तापी पाडळसरे धरणास निधी मिळावा या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या शिष्टमंडळात आमदार शिरीष चौधरी, धुळे येथील माजी आमदार शरद पाटील, जळगाव जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष तथा मारवडचे सरपंच उमेश साळुंखे, शिवसेनेचे अमळनेर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख दीपक पाटील आदी उपस्थित होते. धरणासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन देत हे धरण केवळ अमळनेर तालुकाच नव्हे तर परिसरातील सहा तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारे असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. पाडळसरे धरण जनआंदोलन समिती गेल्या १० दिवसांपासून साखळी उपोषणाला बसली असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून उपोषण स्थगित करावे अशी विनंती आमदारांनी जनआंदोलन समितीस केली.

Web Title: The delegation took a dignified meeting with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव