शेतकऱ्याला गंडविणाऱ्या दिल्लीच्या ठगाची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:26+5:302021-06-28T04:12:26+5:30
जळगाव : अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या ...
जळगाव : अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सचिन राम गुप्ता (रा.दिल्ली) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जून रोजी त्याला दिल्लीतून अटक केली होती. याच गुन्ह्यात मास्टरमाईंड असलेल्या विकास सुरींदर कपूर (रा.दिल्ली) याला आधी अटक झाली होती. २५ रोजी त्याचीही कारागृहात रवानगी झाली आहे. यात हरबंसलाल, कविता, समीर मेहरा शुक्ला, एस.पी.सिन्हा, रिया व मेहता आदी नावे अटकेतील संशयितांकडून पुढे आलेली आहेत. या लोकांचा पत्ता, पूर्ण नाव व इतर माहिती संकलनाचे काम सध्या सुरु असून ते देखील रडारवर आहेत. दरम्यान, अटकेतील संशयितांनी महाराष्ट्रात आणखी इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात गुन्हे केल्याचा संशय पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी व्यक्त केला आहे.