लग्न समारंभाला आलेल्या दिल्लीच्या महिलेची पर्स लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:22 PM2019-11-16T21:22:57+5:302019-11-16T21:23:10+5:30

जळगाव - पिंप्राळा परिसरात दीराच्या लग्न समारंभासाठी आलेल्या नवी दिल्ली येथील माधुरी नीलेश केदारे यांची रोख रक्कम व सोन्याचे ...

 Delhi woman arrives at the wedding ceremony, extended her purse | लग्न समारंभाला आलेल्या दिल्लीच्या महिलेची पर्स लांबविली

लग्न समारंभाला आलेल्या दिल्लीच्या महिलेची पर्स लांबविली

Next

जळगाव- पिंप्राळा परिसरात दीराच्या लग्न समारंभासाठी आलेल्या नवी दिल्ली येथील माधुरी नीलेश केदारे यांची रोख रक्कम व सोन्याचे दागिन असे एकूण २ लाख ४७ हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे़ ही घटना १२ नोव्हेंबर रोजी मानराज पार्कजवळील श्रीराम मंदीर संस्थानच्या मैदानावर घडली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

माधूरी केदारे या नवी दिल्ली येथे पती नीलेश व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत़ त्यांचे पती हे महाराष्ट्र सदनात सहाय्यक लेखाअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माधुरी यांचे सासरे शहरातील कृष्णा पार्क शिवधाम मंदिराच्या मागे राहतात. १२ नोव्हेंबर रोजी माधुरी यांचे दीर नुपेश केदारे याचा लग्नसमारंभ होता. मानराज पार्क परिसरातील श्रीराम मंदीर संस्थेचे परिसरातील मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माधुरी या २७ आॅक्टोबर रोजी जळगावात आल्या होत्या. तसेच लग्न सोहळ्यानिमित्त माधुरी केदारे यांनी कानातले तीन तोळ्याचे झुमके, दहा गॅ्रंमचे मंगळसूत्र व टाप्स असे सोन्याचे दागिणे घेतले होते. तसेच जळगावातून चार ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व नाकातील फुली, दोन भार वजनाचे चांदीचे जोडवे अशा वस्तू घेतल्या. ही सर्व दागिणे माधुरी यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवल्या होत्या़

अर्धा तासात चोरट्यांचा डल्ला
माधुरी केदारे या पती नीलेश व इतर नातेवाईकांसोबत सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास वरातीसोबत मंडपात आल्या. याठिकाणी खुर्चीवर बसल्या. दागिणे तसेच रोकड असलेली पर्स खूर्चीखाली ठेवली. ८ वाजेच्या सुमारास पर्स बघितली असता, आढळून आली नाही. वडीलासोबत शोध घेवूनही ती मिळून आली. या पर्समध्ये ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅमचे सोन्याचे झुमके, ९० हजार रुपयांचा ३० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपयांचे १० ग्रॅम सोन्याची मणिपोत, २० हजाराचे ४ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व नाकातील फुली, १ हजार रुपयांचे २ भारचे चांदीचे जोडवे व १६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४७ हजाराचा ऐवज होता. चोरीची खात्री झाल्यावर माधुरी केदारे यांनी दुसऱ्या दिवशी रामानंद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे करीत आहेत.

 

Web Title:  Delhi woman arrives at the wedding ceremony, extended her purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.