कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्र्थींना धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:21 AM2018-10-01T01:21:45+5:302018-10-01T01:25:20+5:30

भडगाव येथे तहसील कार्यालयात तालुक्यातील लाभार्थी महिलांना आमदारांनी धनादेशाचे नुकतेच वितरण केले.

  Delivery of Checks to beneficiaries of Family Benefit Scheme | कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्र्थींना धनादेशाचे वितरण

कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्र्थींना धनादेशाचे वितरण

googlenewsNext
ठळक मुद्दे८ लाभार्थी महिलांंना प्रत्येकी २० हजारांप्रमाणे मदतएकूण १ लाख ६० हजारांची मदत

भडगाव : तहसिल कार्यालयात  कुटुंब लाभ योजनेच्या ८ लाभार्थी महिलांंना प्रत्येकी २० हजारांप्रमाणे एकुण १ लाख ६० हजारांच्या धनादेशांचे वितरण पारोळा एरंडोलचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम भडगाव तहसिल कार्यालयात २७ रोजी दुपारी १ वाजता पार पडला. तालुक्यातील ८ महीला लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसिलदार सी.एम. वाघ, निवासी नायब तहसिलदार मुकेश हिवाळे, निवडणूक नायब तहसिलदार अशोक कोल्हे, पंचायत समितीचे उपसभापती प्रताप सोनवणे, राष्टÑवादीचे तालुका कार्याध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, राष्टÑवादी मागासवर्गीय सेलचे सुरेंद्र मोरे, संदीप पाटील भातखंडे, संजय परदेशी वङजी, गणेश रावळ, भट्टगावचे ईश्वर बावीस्कर, गिरङचे सुनिल पाटील, नागरीक व आमङदे गिरङ गटातील लाभार्थी महीला उपस्थित होत्या.
 

Web Title:   Delivery of Checks to beneficiaries of Family Benefit Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार