बच्छाव मोटर्स वाहनांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:23+5:302021-01-13T04:39:23+5:30
जळगाव : अशोक लेलँडनिर्मित जळगावस्थित बच्छाव मोटर्स नशिराबादमध्ये यू २८२० टिप्पर ९ स्पीड बोगी सस्पेन्शन १० टायर या ...
जळगाव : अशोक लेलँडनिर्मित जळगावस्थित बच्छाव मोटर्स नशिराबादमध्ये यू २८२० टिप्पर ९ स्पीड बोगी सस्पेन्शन १० टायर या वाहनांचे महाराष्ट्रात प्रथमच वितरण करण्यात आले. जामनेर येथील व्यावसायिक अशोक सोनवणे, प्रवीण पाटील, जीवन खैरे, जयेश पाटील या ग्राहकांना वाहनांचे वितरण करण्यात आले. इतर अवजड वाहनांच्या तुलनेत अशोक लेलँडनिर्मित यू २८२० टिप्पर ९ स्पीड बोगी सस्पेन्शन १० टायर या वाहनाला पसंती दिली. अशोक लेलँड टिप्परची वैशिष्ट्ये म्हणजे २०० हॉर्स पॉवर इंजिन, बोगी सस्पेन्शन, बीएस-६ टेक्नॉलॉजी एव्हीटीआर मॉडेल इतर वाहनांच्या तुलनेत अतिशय सरस आहे आणि दणकट आहे. वाहन वितरणप्रसंगी बच्छाव मोटर्सचे संचालक किरण बच्छाव, व्यवस्थापक सुशील पाटील, भारत सावळे आदी उपस्थित होते. अशोक लेलँडच्या इतर वाहनाच्या चौकशीसाठी बच्छाव मोटर्स नशिराबाद, सुशील पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.