वृक्षाची कत्तल करणाऱ्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:30+5:302021-06-01T04:12:30+5:30
वृक्ष लागवड करणे, ही काळाची गरज असल्याने नारायणवाडी भागातील सागर गणेश मित्रमंडळातर्फे गेल्या पाच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड मोहीम राबविली ...
वृक्ष लागवड करणे, ही काळाची गरज असल्याने नारायणवाडी भागातील सागर गणेश मित्रमंडळातर्फे गेल्या पाच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड मोहीम राबविली होती. सर्वच झाडांचे संगोपन करत झाडे नागरिकांनी वाढवली; मात्र नारायणवाडी परिसरातील रहिवासी यांच्याकडून यातील एका झाडाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता व झाडाची कुठलीही अडचण होत नसताना केवळ द्वेषापोटी या झाडाची खोडापासून कापत कत्तल केली. याप्रकरणी परिसरातील वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला.
मायेनं वाढविलेल्या झाडाची कत्तल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशा मागणीचे निवेदन नारायणवाडी परिसरातील वृक्षप्रेमींतर्फे नगरपालिका, वन विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.
या निवेदनावर शुभम घुले, सागर धुमाळ, अशोक पाटील, हृषीकेश चव्हाण, भिकन जगताप, नंदकिशोर रोकडे, रमेश सोनार, दादाभाऊ कुमावत, संजय पाटील, छोटू पंजे, संतोष कोळी, दीपक हातागळे, दिलीप मगर, प्रकाश कसबे, अतुल कसबे, राहुल राखुंडे व परिसरातील वृक्षप्रेमींच्या सह्या आहेत.
===Photopath===
310521\31jal_2_31052021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव शहरातील नारायणवाडी येथे झाडाची कत्तल करताना तरुण.